Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारचा निधी का पोहोचला नाही? हे मीडियाने पाहावे-- सुजात आंबेडकर

शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारचा निधी का पोहोचला नाही? हे मीडियाने पाहावे– सुजात आंबेडकर

सातारा(अजित जगताप) : महायुतीला राजकीय विरोधक उरला नाही. असा भाग नसून वंचित बहुजन आघाडी वगळता बाकीचे विरोधक भाजपशी हात मिळवली करतील. अशा वेळेला गरजू शेतकऱ्यांपर्यंत जाहीर केलेला निधी गरजू पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत नुकसान भरपाईचा निधी पोहोचला की नाही? हे मीडियाने पहावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली .

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा आयोजित केलेला आहे. लोकेशन व कॉर्डिनेशन घेऊन पुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणे. याला प्राधान्य दिले जात आहे. सर्व अपडेट घेतल्यानंतर सरकारला मदत करण्यास भाग पाडले जाईल. असे स्पष्ट करून युवा नेते आंबेडकर म्हणाले, राज्य सरकार सढळ हस्ते मदत करत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नांदेड येथे २०२४ साली नैसर्गिक संकट आल्यानंतर सुद्धा नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यासाठी वंचितच्या कार्यकर्त्यांना उपोषण करावी लागले. आताही तशासाठी वंचित लढा उभा करत आहे. सरकारकडे पैसे नाही. असा भाग नसून शेतकऱ्यांकडे कोणत्या नजरेने बघत आहे? हे महत्त्वाचे आहे. सरकारचा शेतकऱ्यांविरुद्ध भूमिका घेण्याचा हा निष्काळजीपणा आहे. असे ही त्यांनी आरोप केला.
या सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. म्हणून आंदोलन करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे .वंचित पूर्ण ताकदीने हा लढा उभा करत असताना आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती मधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी वगळून इतर राजकीय पक्षांशी युती करण्याचा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांना दिलेला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात हिंसा- तडे निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. नेपाळमधील घटनांबाबत युवकांना रस्त्यावर उतरण्यास मजबूर केले आहे. युवकांचा आक्रोश वाढत असून नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणली असताना डिस्कार्ड चॅनेल कसे चालू? असाही प्रश्न पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केला.
लडाखमधील बेरोजगारी विरोधात युवक आवाज उठवत आहे. असेही त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे धोरण हे सर्व समावेशक असून पदवीधर मतदार संघासाठी नोंदणी मोहीम, प्रशिक्षण शिबिर सुरू आहेत. त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. कर्जत जामखेड येथे आदिवासी लोकांच्या अंत्यविधीला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आवाज उठवण्यासाठी दिनांक २९ सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ साळुंखे, गणेश भिसे, अमोल गंगावणे, तुषार बेले ,सिद्धार्थ कांबळे, सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

—————————–
फोटो– सातारा येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना युवा नेते सुजात आंबेडकर व मान्यवर (छाया– निनाद जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments