उंडाळे (प्रतिनिधी) मनव ता. कराड गावचे सुपुत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची पदोन्नती होऊन त्यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ या पदावर शहापूर ठाणे जिल्हा या ठिकाणी पदोन्नतीने बढती झाली. सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मण मंडले यांचा शाखा अभियंता ते उपविभागीय जलसंधारण अधिकारी हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, याबद्दल कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला, व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ,पोलीस उपनिरीक्षक एस. जाधव, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते, मंडले यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, यामध्ये कराड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यात आले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यासह सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले,
खा.श्रीनिवासजी पाटील, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट आनंदराव पाटील, ,यासह मनव, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.