सांगली : सत्ताधारी महायुतीचे काही वाचाळवीर आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करताना सभ्यता आणि संस्कृतीची पातळी सोडत आहेत. महाराष्ट्राच्या सभ्य व सुसंस्कृत परंपरेवर होणाऱ्या या वारंवार हल्ल्यांविरुद्ध आज पुष्पराज चौक, सांगली येथे महाविकास आघाडीच्या वतीने “महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा” काढण्यात आला.
या मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्याचे माजी मंत्री राजेश (भैय्या) टोपे, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, लक्ष्मणराव ढोबळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, इंडिया आघाडीचे खासदार विशाल पाटील, प्रदेश सरचिटणीस व आमदार रोहित पवार, विधान परिषद आमदार अरुण लाड, आमदार उत्तमराव जानकर, आमदार रोहित पाटील, काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री विश्वजीत कदम, राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, तसेच माजी आमदार अशोक (बापू) पवार, राजू आवळे, मानसिंग नाईक, विक्रम सावंत, प्रदेश चिटणीस शेखर माने, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौ. संगिता साळुंखे (माई), सांगली ग्रामीण अध्यक्ष देवराज पाटील, सांगली शहर अध्यक्ष संजय बजाज, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, ओबीसी सेल राज्यप्रमुख राज राजापूरकर, विद्यार्थी सेल प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ऍड. अविनाश धायगुडे, शिवाजी वाटेगावकर, दिलीपराव पाटील व प्रा. यशवंत गोसावी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चामधून “सभ्य महाराष्ट्राचा वारसा टिकवू, संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही” असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.





