कुडाळ(अजित जगताप ) : सध्या सातारा जिल्हा परिषद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झाल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये कोण अध्यक्ष होणार? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
सातारा जिल्ह्यात अनेक जण नवरात्र उत्सवापूर्वीच देवीचे पूजन करू लागलेले आहेत. अशा वेळी पंधरा वर्षांपूर्वी इतर मागासवर्गीय राखीव जागेतून निवडून आलेल्या कुडाळ येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभाताई प्रमोद बारटक्के यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जावळी तालुक्यातील कुडाळ सारख्या बाजारपेठेच्या गावामध्ये कापड व्यवसाय यातूनच उदरनिर्वाह करणाऱ्या श्री प्रमोद बारटक्के यांचे कुडाळ व करहर या ठिकाणी कपड्याचे दुकान होते. त्यामुळे त्यांचा संपर्क असल्याने राजकीय नेत्यांनी सुद्धा राजकारणात कोरी पाटी असलेल्या सौ शोभाताई बारटक्के यांनी उमेदवारी करावी. अशी आग्रहाची मागणी केली. नातेवाईक मंडळी व जाणकार नेतेगण यांच्याशी चर्चा विनिमय करून अखेर जावळी तालुक्याचे माजी आमदार व अभ्यासू नेतृत्व सन्माननीय स्वर्गीय लालसिंगराव शिंदे (काका) यांनी उमेदवारी देण्यासाठी शब्द टाकला आणि सौ शोभाताई बारटक्के यांची उमेदवारी चालून आली. निवडून सुद्धा आणले. त्यानंतर त्यांनी कुडाळ जिल्हा परिषद गटांमध्ये विकास कामे करण्यासाठी नेत्यांच्या आदेशाने प्रत्येक गावात विकास कामाचा निधी पोहोचवला.
विशेष बाब म्हणजे जावळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता व राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या असा मेळ त्यांनी बसवला. कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील रस्ते, प्राथमिक शाळेच्या खोल्या, समाज मंदिर , संरक्षक भिंत आणि व्यक्तिगत शासकीय योजना राबविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. महिला बचत गटांना सक्षम करताना सर्व गोरगरीब महिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. वेळेप्रसंगी गरीब महिला वर्गाचा आत्मविश्वास वाढवला. त्याचबरोबर त्यांनी कुडाळ, हुमगाव ,आखाडे, करहर, खर्शीतर्फ बारामुरे, हातगेघर आधी परिसरात विकास कामे करताना त्यांनी व त्यांच्या मार्गदर्शक नेत्यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले. त्यामुळे आजही ग्रामीण भागात एवढ्या वर्षांनी त्यांनी केलेल्या विकास कामाबाबत जनता विसरली नाही. राजकारणामध्ये संधी मिळाली. त्या संधीचे सोनं करत असताना अधिक अपेक्षा न ठेवता सध्या नेत्यांची निष्ठा त्यांनी जपली आहे. समाधानी जीवन जगत असताना सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याची आजही त्यांची तळमळ आहे.
पंधरा वर्षांपूर्वी सातारा जिल्हा परिषद इतर मागासवर्गीय महिलांसाठी अध्यक्ष पद आरक्षित झाले. त्यानंतर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधून तुम्ही आमच्या गटामध्ये या तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवून दाखवतो. अशी शपथ घेतली परंतु, जर मला माझ्या नेत्यांनी राजीनामा मागितला तर मी त्वरित राजीनामा देईन पण माझ्या नेत्यांची प्रतारणा करणार नाही. असं त्यांनी ठणकावून सांगितले. सत्तेसाठी निष्ठा सोडणार नाही. असा जावळीचा बाणा दाखवणाऱ्या सौ. शोभाताई बारटक्के सध्या कुडाळ मध्ये आजही आपला संसार व कापड व्यवसायामध्ये रामबाण होताना अनेकांना त्यांच्या परीने मदतही करत आहेत.
आपल्या नेत्याबद्दल निष्ठा दाखवण्यासाठी त्यांना जाहिरात बाजी करण्याची गरज उरलेली नाही. उलट राजकारणात पंधरा वर्ष लांब राहून सुद्धा त्यांनी माणुसकी जपली आहे. आजही त्यांना पुन्हा एकदा लढा हे सांगण्यासाठी राजकारणातील मुरब्बी व अभ्यासू व्यक्तिमत्व संपर्कात येत आहेत.
जावळी सातारा विधानसभा मतदारसंघ झाल्यापासून आजही कुडाळ परिसरात युवा नेते सौरभ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व बारटक्के कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुडाळ गावामध्ये मंत्री नामदार भोसले जेव्हा जेव्हा येतात त्यावेळी आठवणीने ते बारटक्के कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस करतात.
सर्वात प्रभावी काम म्हणजे सौ शोभा बालटक्के या खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. कारण त्यांचे पती प्रमोद बालटक्के यांनी कधीही पाच वर्षांमध्ये पत्नी जिल्हा परिषद सदस्या असताना सातारा जिल्हा परिषदेची पायरी चढली नाही. आज साधे ग्रामपंचायत सदस्य महिला झाल्यानंतर तिचा पती ग्रामपंचायत दरवाजा कुलपाने उघडण्यास पुढे असतो. इतर पदाबद्दल न बोललेले बरे. असे कुडाळ मधील जनता सांगत आहे.
श्री बारटक्के यांच्या कपड्याच्या व्यवसायातून अनेकदा गोरगरिबांना त्यांच्या शुभकार्यासाठी मदत करणे. एवढेच नव्हे तर वाजवी किमतीमध्ये त्यांच्या साहित्य देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणे. हे आजही ते काम करत आहेत.
सातारा जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांनी कधीही गैरफायदा घेतला नाही. पदाचाही मोठेपणा मिरवला नाही. आजही खेड्यापाड्यातील लोक त्यांना जिल्हा परिषद सदस्या म्हणूनच ओळखतात. वारकरी संप्रदाय व भगवा पताका याच्याशी कधीही त्यांनी प्रतारणा केली नाही. संत नामदेव शिंपी समाजाच्या कार्यातही ते जेवढे सहभाग होतात. तेवढा सहभाग ते अल्पसंख्याकांच्याही कार्यक्रमाला घेतात . त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहताना सर्वधर्मसमभावाचीच शिकवण त्यांच्या अंगी असल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा इतर मागासवर्गीय महिलेला संधी मिळाला आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु त्याहीपेक्षा निष्ठा महत्वाची आहे. ज्यांनी निष्ठा पूर्वक काम केले आहे त्यांना संधी मिळावी. कोणतेही जातीच्या आरक्षण चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या महिलेला संधी मिळाली तर अधिक आनंद होईल असंही त्यांनी थोडक्यात सांगितले. दरम्यान त्यांनी ज्या बालवाडीला निधी दिला. त्या बालवाडीत शिकणारी मुलं आता मतदार झालेले आहेत.ते नक्कीच विचारपूर्वक मतदान करतील असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
जर निष्ठा बदलली असती तर नक्कीच जि. प. अध्यक्ष पद मिळाले असते-सौ . शोभाताई बारटक्के
RELATED ARTICLES