मुंबई : माननीय श्री दिलीप सांघाणी (अध्यक्ष एनसीयूआय आणि चेअरमन इफ्को व गुजरात को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन) यांच्या गौरवपूर्ण उपस्थितीत एग्री एशिया 2025 आणि डीएलपी एशिया 2025 चे आयोजन दिनांक 18 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान गांधीनगर, गुजरात येथे होणार आहे. रेडिकल कम्युनिकेशन्स (इंडिया) यांच्या पुढाकाराने आणि AMMA-India, GPDFA, इफ्को, GUJCOMASOL यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी पोल्ट्री पॅव्हिलियन हे नवीन आकर्षण असणार आहे. ब्रोइलर आणि लेयर पोल्ट्री असोसिएशनच्या सहकार्याने नव्या तंत्रज्ञान, नेटवर्किंग आणि स्टार्ट अप्ससाठी हे व्यासपीठ उभारले जात आहे. 250 हून अधिक प्रदर्शक आणि एक लाखाहून अधिक आगंतुक सहभागी होणार आहेत. केनिया, इथिओपिया, इराण, पोलंड यांसारख्या देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात आधुनिक शेती यंत्रसामग्री पासून पशुपालन, पोल्ट्री व्यवस्थापन आणि वित्तीय उपायांपर्यंत विविध विषयांवर सेमिनार, प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केली जाणार आहेत. MSME मंत्रालयाची मान्यता आणि GSIA सह अनेक उद्योग संघटनांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे.
कृषी क्षेत्रातील प्रगत उपाय आणि नवकल्पना जाणून घेण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे.