Saturday, September 13, 2025
घरमहाराष्ट्रकराड-पाचवडेश्वर घाटावर स्वच्छतेसाठी सामाजिक उपक्रम

कराड-पाचवडेश्वर घाटावर स्वच्छतेसाठी सामाजिक उपक्रम

कराड(प्रताप भणगे) : कराड-पाचवडेश्वर कृष्णा नदी घाट येथे गणेश विसर्जनानंतर अनेक गणेश मूर्ती नदीकिनारी राहून त्यांची विटंबना होत होती. तसेच आसपासचा परिसर अस्वच्छ होऊन कचऱ्याचे ढिगारे तयार झाले होते. या समस्येवर उपाय म्हणून मा. आमदार डॉ. अतुल भोसले बाबा समर्थक, दयानंद पाटील भाऊ मित्र परिवार, कालेटेक येथील श्री बाळासाहेब जावीर, राहुल यादव आणि प्रकाश मोरे मित्र परिवार यांनी पुढाकार घेत गणेश मूर्ती व घनकचरा हटवण्याचे कार्य केले.

सर्वांनी मिळून नदी किनारा आणि परिसर स्वच्छ करून तो सुशोभित केला. यावेळी त्यांनी नागरिकांना विनंती केली की, “कृपया या ठिकाणी घनकचरा टाकू नये. आपला गाव आपणच स्वच्छ ठेवण्याची ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.”

या उपक्रमामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती होऊन नदी परिसराचा सुशोभिकरणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments