Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनाका कामगारांच्या घामाचा कुटुंबासह सन्मान

नाका कामगारांच्या घामाचा कुटुंबासह सन्मान

मुंबई (रमेश औताडे) : प्रभात ट्रस्ट डोळ्यांचा फिरत्या दवाखान्यातून मोफत डोळे तपासणी, चष्मा, औषधे व कडधान्य वितरण, वार्षिक आरोग्य तपासणी अशा विविध उपक्रमातून नाका कामगार प्रभात कुटुंबाचा एक घटक झाले आहे. यासाठी नाका कामगारांसाठी सन्मान कष्टाचा अर्थात नाका कामगारांच्या घामाचा सन्मान व त्यांच्या कुटुंबाचा मेळावा रविवार 5 मे रोजी नवी मुंबई घणसोली येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात कामगारांच्या जीवनावरती आधारित कवितांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. कविता डॉट कॉमचे प्रा.रवींद्र पाटील सर, कवी जितेंद्र लाड यांच्या जोडीला बालकवी प्रसाद माळी, दक्षता लाड, अंकिता गोळे यांनी कामगारांच्या हृदयाला साथ घालणाऱ्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी शंकर गोपाळे यांनी केले.

श्रमाला मोल मिळो .. घामाला दाम मिळो…या हातांना काम मिळो..अन कामाला सन्मान मिळो.. या आशयाची ” मी नाका कामगार” ही कविता कामगारांनी सादर केली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनात्मक खेळासाठी नाका कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रा. अजित मगदूम यांनी व्यसनमुक्तीसाठी नाका कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी होते. त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ चे वितरण करण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये पहिल्या क्रमांकाला विजेत्या ठरणाऱ्या कल्लू खान यांना सायकल प्रदान करण्यात आली.अशी माहिती प्रभात ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. प्रशांत भास्करराव थोरात यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments