विरार प्रतिनिधी : महाबळेश्वर येथील हरचंदी गावचे रहिवासी विजय आनंद मोरे यांची केवळ ६ वर्षांची चिमुरडी सान्वी हिचा ३१ जुलै रोजी विरारच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. हा मृत्यू दुर्दैवी असला तरी यामागे हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाचा संशय व्यक्त केला जात आहे.
सान्वीला २९ जुलै रोजी शाळेत चक्कर आल्यामुळे यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ती ३१ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेपर्यंत पूर्णपणे भानावर होती आणि तिने वडिलांना “पप्पा, मला घरी घेऊन चला” असंही सांगितलं होतं. पण त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत तिला इंजेक्शन देण्यात आलं आणि तिची तब्येत अचानक खालावली.
डॉक्टरांकडून गंभीर दुर्लक्ष?
- सान्वी गंभीर झाल्यानंतर आई-वडिलांना रूममधून बाहेर काढण्यात आलं
- कोणालाही काहीही न सांगता मुलीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं
- रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं
- मृत्यूच्या तीन दिवसांनंतर डिस्चार्ज फाईल मागितल्यावर ती देण्यास नकार
- उलट पोलिसांना बोलावून नातेवाईकांना हॉस्पिटलच्या बाहेर काढलं
- मृत्यूनंतर हॉस्पिटल पोलिस बंदोबस्तात बंद ठेवण्यात आलं
सान्वीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील अतिशय गरीब परिस्थितीत जीवन जगतात. त्यांनी आणि समाजातील अनेक बांधवांनी आवाज उठवला आहे की, ह्या प्रकारात दोषी डॉक्टरांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.
मानवेलपाडा (विरार पूर्व) पोलिस ठाण्यात यशोदा हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. हा लढा केवळ सान्वीसाठी नाही, तर भविष्यात अशा हलगर्जीपणामुळे कोणाच्याही जीवाशी खेळ होऊ नये यासाठी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती
सान्वीच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांकडे कळकळीची मागणी केली आहे की,
“या हॉस्पिटलवर बंदी आणावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, हीच आमच्या मुलीसाठी खरी श्रद्धांजली ठरणार आहे.