मुंबई : कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भूमिहीन आंदोलनातील सत्याग्रही, बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र व कुर्ला येथील समाजसेवक किसनराव लक्ष्मण झनके यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ पत्रकार,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्मानित व एक वही, एक पेन अभियानचे प्रणेते राजू झनके आणि जगदीश झनके यांचे
ते वडील होत.
भूमिहिनांच्या सत्याग्रह आंदोलनातील सक्रिय सहभागाबद्दल पोलीसांनी किसनराव झनके यांची रवानगी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून नागपूरच्या कारागृहात केली होती.त्यांना ९ दिवसांचा कारावास ठोठावण्यात आला होता.
भूमिहीनांच्या चळवळीतील योगदानाबद्दल राज्याचे तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात किसनराव झनके यांचा गौरव करून त्यांना राज्य सरकारच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते.
किसनराव झनके यांची अंत्ययात्रेत माजी मंत्री महादेव जानकर,माजी मंत्री अविनाश महातेकर,भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.के भंडारे,
रेल्वेचे निवृत्त अधिकारी शाम तुळवे,भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे,मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड,दिनेश शर्मा,प्रीतेश पवार,पॅथर नेते अरविंद निकाळजे,दीलीपदादा जगताप,पोपटराव सोनावणे,
माजी नगरसेवक राजेंद्र वाघमारे.रवि गरूड,
समाजसेवक प्रदिप ईंगळे,
रवि गायकवाड,विजय मोरे,श्रीकांत भिसे,सुशीला कापुरे ,समाजभूषण राजेंद्र झेंडे,पत्रकार जाधव ,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष
प्रमोद डोईफोडे ,समाजभूषण नासिकेत पानसरे,जासंग बोपेगावकर,ज्येष्फ पत्रकार सदानंद खोपकर, खंडूराज गायकवाड,
श्रीकांत जाधव,यांच्यासह चळवळीतील विविध पक्षसंघटनांचे नेते पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.भीम आर्मीचे संस्थापक खासदार अॅड.चंद्रशेखर आजाद,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्रा.जोगेन्द्र कवाडे,विनय रतन सिंग,अनिल धेनवाल,
भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ.भीमराव आंबेडकर ,रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,
पॅथर नेते ज.वि.पवार,
साहीत्यिक शिवा ईंगोले ,यांच्यासह अनेक मान्यवरांनी झनके कुटुबियांचे सांत्वन केले.
तर ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, सुरेंद्र गांगण,राजाभाऊ आदाटे,मंदार पारकर,रामदीनेश यादव ,एस एन सिंग यांनी झनके यांच्या कुर्ला निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
भूमिहीनांच्या आंदोलनातील सत्याग्रही किसनराव झनके यांचे निधन ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
RELATED ARTICLES