Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्र"यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५" वितरण सोहळा १० ऑगस्ट रोजी घणसोलीत संपन्न होणार

“यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” वितरण सोहळा १० ऑगस्ट रोजी घणसोलीत संपन्न होणार

नवी मुंबई : यशवंतराव चव्हाण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा “यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” वितरण सोहळा रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ ते सायं. ७ या वेळेत नवी मुंबई महानगरपालिका सभागृह, घणसोली, सेक्टर ७ (डी मार्ट जवळ) येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे (भारत सरकार) संचालक आणि स्टील मंत्रालयासाठी राज्य मंत्री दर्जाने निवड झालेले नामदार भरत नाना पाटील यांचा भव्य सत्कार होणार असून कार्यक्रमाचे शुभहस्त असणार आहेत. आमदार विक्रांत दादा पाटील (महामंत्री, भाजपा महाराष्ट्र प्रदेश)यांच्यासह

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मा. महेश म्हात्रे (मुंबई), विजय चोरमारे बापू (कोल्हापूर), जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप (ठाणे), उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण (मुंबई), पर्यटन मंत्री यांचे खाजगी सचिव प्रल्हाद हिरामनी, महिला नेत्या सौ. रंजना शिंचे (नवी मुंबई), वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऑदुंबर पाटील (कोपर), धर्मादाय आयुक्तालयाचे आर. के. बडवई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच कविता कचरे, मेघना काकडे-माने, चंद्रकांत चाळके, सचिन आचरे, प्रमोद देशमाने, सुभाष बावडेक, किसन मन्करताग, प्रकाश बोत्रे (सरपंच), संजय आंबुळकर, प्रमोद साळुंखे, सुशांत कुसुरकर (पोलीस निरीक्षक, मुंबई) यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

विशेष उपस्थितीत अमित शेटे, रंजना एकावडे, सुशांत भिसे, अमोल भिंगारदेवे, अंकुश सावंत, विनायक सावेकर, हेमंत ताईगडे, संतोषी चव्हाण, उज्ज्वला दोले, अनिल डाकवे, यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

सदर कार्यक्रम पूर्वनियोजित १५ ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव तो १० ऑगस्ट रोजी घेण्यात येत असल्याची माहिती आयोजक यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष आणि साप्ताहिक ‘यशवंतनीती’चे संपादक संजय रत्नाबाई सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments