Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रतारगाव सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध; बाळासाहेब पाटील यांच्याकडे नवनिर्वाचित संचालक मंडळाची सदिच्छा...

तारगाव सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध; बाळासाहेब पाटील यांच्याकडे नवनिर्वाचित संचालक मंडळाची सदिच्छा भेट

कराड(प्रताप भणगे ) : तारगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच अत्यंत शांततेत व बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत किशोर निकम, विजय मोरे, माधव भोसले, राजेंद्र निकम, सतीश यादव, सुनील यादव, राम साळुंखे, बशीर इनामदार, उज्वला मोरे, हणमंत कुदळे, मधुकर भिसे आणि शहाजी पोकळे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील (तात्या) यांच्या नेतृत्वाखाली कराड येथील संपर्क कार्यालयात राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत बाळासाहेब पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “ही सोसायटी आपल्या सर्व सभासदांच्या आर्थिक गरजांची पूर्तता प्रभावीपणे करेल व सहकार चळवळ अधिक बळकट करेल.”

या प्रसंगी झालेल्या सत्कार समारंभाला सह्याद्रि साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील (तात्या), लक्ष्मण निकम (तात्या), विलास मोरे, बाळासाहेब यादव, गोरखनाथ गोळे, भगवान उबाळे, गोरखनाथ काळे, ॲड. संदीप जाधव, अक्षय नलवडे, संजय उबाळे, मारुती मानकर, वसंत शिंदे, विठ्ठल मस्कर, मोहन यादव, दिनकर यादव, दाजीराम यादव, तानाजी उबाळे, सुरेश पोकळे, लक्ष्मण साळुंखे, बाळकृष्ण साळुंखे, रमेश गोळे, राजू पाटील तसेच अनेक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारभावनेने प्रेरित होऊन बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाकडून आगामी काळात ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments