मुंबई (शांताराम गुडेकर) : स्वतंत्र कोकण राज्य अभियान अंतर्गत विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० भगिनी आणि २५ कोकणी बांधवाना शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, महापालिका मार्ग, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत “कोकण रत्न” पदवी प्रदान करण्यात येणार आहे.यामध्ये पदवी प्राप्त भगिनींना सेमी पैठणी साडी ,गोल्ड प्लेटेड मेडल, आकर्षक फ्रेम मध्ये कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र तर पुरुषांना कोकणरत्न पदवी प्रमाणपत्र,गोल्ड प्लेटेड मेडलप्रदान
करण्यात येईल.
कोकण रत्न पदवीसाठी संजय कोकरे संस्थापक / अध्यक्ष 9224443119, 2) धंनजय कुवेसकर मुंबई अध्यक्ष 9869076602, 3) सुखदेव पवार संघटक 8082769 091 यांच्या व्हाट्सअप नंबरवर आपले नामांकन पाठवावे असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक / अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे. कोकण रत्न पदवीसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही याची नोंद घेण्यात यावी.तरी इच्छुकांनी दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर आपली सविस्तर माहिती पाठवावी असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे करण्यात करण्यात आले आहे.
“कोकण रत्न ” पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन
RELATED ARTICLES