Sunday, August 31, 2025
घरमनोरंजनज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनवर अन्यायाचा आरोप; FWICE विरुद्ध पत्रकार परिषद; त्यांची निवडणूक बिनविरोध...

ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनवर अन्यायाचा आरोप; FWICE विरुद्ध पत्रकार परिषद; त्यांची निवडणूक बिनविरोध अरविंद सकट अध्यक्ष

मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संस्थेचे अधिकारी श्री अशोक दुबे, गंगेश्वर श्रीवास्तव, बी.बी. तिवारी आणि राजा फिरोज खान यांनी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनवर अन्याय करत असल्याचा आरोप करत आज मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. FWICE कडून बेकायदेशीर निवडणुका घेत युनियन तोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही सर्व सदस्यांनी एकत्र येऊन तो हाणून पाडला, असे यावेळी सांगण्यात आले. घटना व कायद्यानुसार एक महिना आधी नोटीस देऊन निवडणूक घेण्यात आली असून सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. FWICE ही संघटना वारंवार विभाजन करून युनियन तोडण्याचा प्रयत्न करते, म्हणून FWICE चे ट्रेड युनियन रजिस्ट्रेशन रद्द करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

जूनियर आर्टिस्ट असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले यामध्ये अरविंद सकट अध्यक्ष मोहम्मद हुसेन शेख जॉइंट सेक्रेटरी राजेंद्र जिनवाल खजिनदार मोहम्मद जावेद कुरेशी उपाध्यक्ष मोहम्मद अकबर शेख जनरल सेक्रेटरी, कार्यकारणी सदस्य अजीज शेरखान, वसीम बॅग, आयुब अहमद खान, शरबुद्दीन शेख, सोहिल अन्सर आगवान, तौसिफ हुसेन काझी

यांची संघटनेने बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यशवंत गंगावणे, जाहिद शेख, व प्रकाश सोलिया यांनी काम पाहिले. जाहीर शेख यांनी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन कार्यकारणी घोषित केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments