सातारा(अजित जगताप ) : कोणत्याही सार्वजनिक उपक्रम राबवताना सर्वांचा हातभार मोलाचा आहे. त्याचबरोबर निविदामध्ये नमूद केल्याप्रमाणे काम करणाऱ्या ठेकेदारांची ही योगदान आहे. हे नाकारून चालणार नाही. परंतु, सध्या सातारा जिल्ह्यात सुमारे साडे चारशे कोटी रुपये काही ठेकेदारांची देणे देण्याचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी वर्गाला सुद्धा न्यायालय प्रक्रियेसारखी तारीख पे तारीख घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
सातारा जिल्ह्यातील ठेकेदारांची नेमकी संख्या ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या फलकातून निश्चित करता येत नाही. शासकीय आकडेवारीमध्ये उपलब्ध नाही. तथापि, सातारा जिल्ह्यामध्ये बांधकाम, रस्ते, वीज, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक ठेकेदार आहेत. सुशिक्षित बेरोजगार पासून ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांपासून अनेक जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या यामध्ये सामील झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण , कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग,सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग माध्यमातून
अनेक लहान-मोठे ठेकेदार:
बांधकाम, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक लहान-मोठे ठेकेदार कार्यरत आहेत. राजकीय शिफारसीमुळे काही ठेकेदार शासनाकडे नोंदणीकृत नसतानाही उप ठेकेदार म्हणून काम करतात. कामे पूर्ण होऊनही त्यांना देख न मिळाल्यामुळे काही ठेकेदार व्यवसाय सोडून गेले, तर काहीनी नवीन पर्याय स्वीकारला आहे.
गेल्या सहा महिन्यापासून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
अभियंता, मजूर संस्था, विकासक,
बांधकाम विभाग, ग्राम विकास, नगर विकास,जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन योजनेअंतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही उद्घाघाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्ज काढून ठेकेदार बनलेल्या काही ठेकेदारांना वर्षभर देयक मिळाले नाहीत. तर ज्यांनी काम न करता बिल सादर केलेले आहे. त्यांना मात्र फारशी झळ बसत नाही.
ज्यांनी निविदाच्या निकषाप्रमाणे कामे पूर्ण करून विकास कामांची
बिले गेल्या दहा महिन्यापासून मिळालेली
नाहीत. याबाबतची नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार
महासंघाने सातारा जिल्हा शाखेच्या वतीने ठेकेदारांच्या शिष्टमंडळाने
साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सध्या पावसाळी अधिवेशन होत असून दिवाळीपूर्वी सर्व देयक देण्याच्या हालचाली वित्त विभागाने केल्याची माहिती एका ज्येष्ठ मंत्र्याने दिल्याचे समजते.
______________________________
फोटो– सातारा जिल्हा ठेकेदार संघटनेच्या वतीने निवेदन देताना (छाया– निनाद जगताप, सातारा)