Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्रप्रविणदादा गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा रिपब्लिकन फोर्सतर्फे निषेध

प्रविणदादा गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा रिपब्लिकन फोर्सतर्फे निषेध

प्रतिनिधी : अक्कलकोट येथे १३ जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंडांनी शाईफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या भ्याड हल्ल्याचा बहुजन परिषद रिपब्लिकन फोर्सतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. गायकवाड हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे प्रबोधन करणारे नेतृत्व असून त्यांच्यावरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या सामाजिक प्रतिष्ठेवर आघात असल्याचे अध्यक्ष अॅड. यशवंत गंगावणे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांवर खुनाचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि गायकवाड यांना Y+ सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा सरकारविरोधात राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. लवकरच मुंबईत गायकवाड यांचा दूग्धाभिषेक करून सत्कार करण्यात येणार असून, माणगाव तालुका व इतर भागातील बहुजन समाज त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments