प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वरचे विद्यार्थांनी नेत्रदीपक यश मिळवले . नुकताच शिक्रापूर येथे श्री राजेश क्षीरसागर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर , श्री तुषार शिंदे सहाय्यक परिवहन अधिकारी, श्री विकी खवळे सहाय्यक वित्त विभाग महाराष्ट्र शासन, श्री विक्रम आव्हाड बाल साहित्य लेखक, श्री शशांक मोहिते प्रसिद्ध व्याख्याते , श्री संभाजीराव देशमुख नवभारत साक्षरता राज्य समन्वयक या मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला .
मंथन स्पर्धा परीक्षेत राज्य स्तरावर शाळेचे विद्यार्थी अर्जून चव्हाण ( इ १ ली ) देवराज खलाटे ,अद्वय घोरपडे, खुशी धोत्रे, (इ २ री )श्रीतेज चव्हाण (इ ३ री )तर जिल्हा स्तरावर दुईता आडके, आराध्या शिंदे (इ १ली ) आदित्य कुंभार, स्माईली घोरपडे, आल्फिया शेख , संकल्प देशमुख , स्वरांजली सरडे, श्वेता वाघमारे , शरण्या तांबे, तृप्ती जगताप , श्रेयांश भोसले (इ २ री ) सदर विद्यार्थांचा वरील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . केंद्र स्तरावर श्रीराम कुंभार (इ १ ली ) आयुष लांडगे ( इ २ री )वेदांत जगताप (ई ३ री )ऋतुजा सरडे, आलिया शेख ( इ ४ थी ) यांनी केंद्र स्तरावर प्राविण्य मिळवले .
स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते , उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे , मनिषा चव्हाण यांनी मुलांना मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यार्थी – माता – मार्गदर्शक शिक्षक यांनी सत्कार स्विकारले .
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक ग्रामस्थ पदाधिकारी व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री निलेश गवळी साहेब , केंद्रप्रमुख श्री संतोष खलाटे यांनी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले .
मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर चे विद्यार्थी राज्य व जिल्हा स्तरावर अव्वल
RELATED ARTICLES