प्रतिनिधी : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पत्रकारिता पुरस्कार यंदा डॉ. संदीप डाकवे आणि सौ. रेश्मा संदीप डाकवे यांना प्रदान करण्यात आला.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तसेच “स्पंदन परिवार” या माध्यमातून गरजू आणि वंचितांसाठी केलेल्या मदतीच्या कार्यामुळे त्यांना यापूर्वीही राज्यस्तरीय तसेच महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार लाभले आहेत.
या पुरस्काराने त्यांच्या कार्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.