ताज्या बातम्या

बातमीचा इम्पॅक्ट…! डाळिंबी बाग-काले रस्त्यावरील भेगा दुरुस्त; DDM News मुळे नागरिकांचे काम मार्गी

काले (ता. कराड): डाळिंबी बाग येथून काले गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, बैलगाडीच्या चाकांमुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्याचे DDM न्यूजच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास २९ जून २०२५ रोजी आले.

या संदर्भातील तक्रार आणि प्रत्यक्ष छायाचित्रासह DDM न्यूज पोर्टलवर ऑनलाईन बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. संबंधित बातमी सोशल मिडियावर आणि प्रशासनाकडे व्हायरल झाल्यानंतर, ठेकेदाराने तत्काळ लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती पुन्हा केली.

या दुरुस्तीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, “हे काम केवळ DDM न्यूज मुळे शक्य झाले,” असे सांगत प्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

DDM न्यूजच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे जनतेच्या समस्या लवकर सुटत असल्याचे याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top