Wednesday, June 25, 2025
घरआरोग्यविषयककॅन्सर रुग्णांसाठी आता कॅनविन चे व्यासपीठ

कॅन्सर रुग्णांसाठी आता कॅनविन चे व्यासपीठ

प्रतिनिधी : एखाद्याला कॅन्सर झाला आहे हे वाक्य ऐकूनच मन कसे सुन्न होते. या कॅन्सर सोबत झुंज देण्यासाठी व कॅन्सर पेशंटची व त्यांच्या नातेवाईकांसाठी अपोलो हॉस्पिटल ने कॅनविन चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशी माहिती हॉस्पिटल चे अध्यक्ष दिनेश माधवन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

कॅनविन म्हणजे , कॅन्सर झाल्यानंतर रुग्ण व त्यांचे कुटुंबीय, कॅन्सर आजाराने वाचलेले रुग्ण, डॉक्टर आणि स्वयंसेवक, समुपदेशक अशा सगळ्यांना एकत्र आणून आधार देण्याचे व्यासपीठ असून कॅन्सर आजारात आता मी एकटा नाही यासाठी कॅनविन चे व्यासपीठ माझ्यासोबत आहे असा आत्मविश्वास त्या पेशंटला व त्यांच्या नातेवाईकाला मिळतो असे डॉ ज्योती वाजपेयी व डॉ नीता नायर यांनी सांगितले.

राष्ट्रीय कॅन्सर अभियान सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही हि मोहीम सुरू केली आहे. यावेळी कॅन्सर बरोबर झुंज देऊन त्याला घायाळ केले व विजय मिळवला. यासाठी या व्यासपीठाची खूप मदत झाल्याने जगण्याची शक्ती मिळाली. असे यावेळी डॉ अनिल डिक्रुझ व डॉ विपीन खंडेलवाल, डॉ ऋतुपर्ण घोष यांनी व काही रुग्णांनी व त्यांच्या पालकांनी सांगितले. कॅन्सर च्या उपचारादरम्यान त्या कठीण काळाची आठवण या व्यासपीठामुळे होत नसून आता फक्त आनंदाने जगणे व जीवनाचा आनंद घेणे हेच या व्यासपीठाने दाखवून दिले आहे. असे एका पेशंट ने सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments