ताज्या बातम्या

येवती येथील नवनिर्वाचित दक्ष नागरिक कमिटीने घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) येवती ता.कराङ येथील दक्ष नागरिक कमिटीचे अध्यक्षपदी विलास शेवाळे, तर उपाध्यक्षपदी समाधान सोरटे, सचिव पदी सागर शेवाळे, कार्याध्यक्ष शंकर सोरटे, संपर्कप्रमुख पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, सदस्य पदी निलेश देसाई, विनायक जाधव ,सविनय सोरटे, सचिन जाधव, शंकर सोनवणे, विक्रम शेवाळे, विष्णू साहेब पुजारी, शंकर सोनवणे, किसन साठे, रमेश लोखंडे, संपत कुंभार यांच्या यांच्या नियुक्ती करण्यात आल्या, सदर नियुक्त्या झाल्यानंतर, दक्ष नागरिक कमिटीच्या सदस्यांनी, कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराड तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र माळी, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता पाटील साहेब, शाखा अभियंता लक्ष्मण मंडले, या सर्व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन दक्ष नागरिक कमिटीला सहकार्य करण्याची विनंती केली, यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी या कमिटीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कमिटीचे सर्व पदाधिकारी ,सदस्य , सोसायटीचे तज्ञ संचालक अनिल शेवाळे उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top