ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

राजर्षी शाहू पुरस्कार २०२५ : जीवन गौरव व राष्ट्रीय सन्मानाने मान्यवरांचा २९ जूनला होणार गौरव

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्ताने २९ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे भव्य पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टमानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

या समारंभात राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार २०२५ प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे (रूकडी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५५ मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्का रप्राप्तांमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, कणकवली व पनवेलसह विविध जिल्ह्यांतील मान्यवरांचा समावेश आहे.

पुरस्काराचे स्वरूप : मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि पुस्तके.

या कार्यक्रमास आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून मान्यवरांचा गौरव वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.संपर्क : अधिक माहितीसाठी ८४२१३६४१२९ संपर्क करावा.

Scroll to Top