ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

पावसाळा आला ; शिवसेनेच्या छत्र्याही आल्या ; बोरीवली पूर्व येथे समारंभपूर्वक वितरण

प्रतिनिधी : शाळा सुरू झाल्या, पावसाळा आला की विविध संस्था, राजकीय पक्ष वह्या पुस्तके आणि छत्र्यांचे वाटपाचे कार्यक्रम जोमाने हाती घेतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस योगायोगाने पावसाळ्यात येतात. मग काय. दे धम्माल ! १३ जून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून शिवसेनेचा वर्धापन दिन. या दिवसांचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ. शुभदा शिंदे विधानसभा प्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभाप्रमुख रेखा बोऱ्हाडे, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, विधानसभा संघटक मिलिंद साटम, विधानसभा संघटक रोहिणी चौगुले, उपविधानसभा समन्वयक वैभवी तावडे, युवा विभाग अधिकारी वृषल पुसाळकर, शाखा समन्वयक योगेश देसाई, उपविधानसभा समन्वयक सारिका झोरे, विधानसभा समन्वयक सुप्रिया बोवलेकर, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा संघटक माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक इतिश्री महाडिक, शाखा अधिकारी आशिष सोंडकर, शाखासंघटक वनिता दळवी, अरविंद शिंदे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे
आयोजन मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे आणि उपशाखाप्रमुख अशोक खताळ यांनी केले.

Scroll to Top