ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

“नाट्य शुक्रवार” उपक्रमाची घोषणा; मुंबई मराठी पत्रकार संघात सांस्कृतिक स्पंदनांना नवे व्यासपीठ

मुंबई : (सदानंद खोपकर) मुंबई मराठी पत्रकार संघ सदस्य आणि त्यांची मुले यांच्यातील, सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी आवड व नाट्यगुणांना वाव देण्यासाठी पत्रकार संघात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी “नाट्य शुक्रवार”,या उपक्रमाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.प्रसिद्ध रंगकर्मी रविंद्र देवधर, हे संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती मिळाली.
देवधर यांनी निस्सीम राष्ट्रभक्ती या भावनेतून, नव्या पिढीत ती जाणीव राहावी यासाठी “मी एक भारतीय”, या नाटकाची निर्मिती स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षात केली.१५ऑगस्ट२०२१, रोजी त्याचा शुभारंभ प्रयोग मालवण येथे केला. आजवर २०७ प्रयोग झालेल्या या द्विपात्री दीर्घांकाचा प्रयोग “नाट्य शुक्रवार”, उपक्रमांतर्गत पत्रकार संघ सदस्य व कुटुंबियांसाठी सादर होणार आहे.

Scroll to Top