ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा: हर्षवर्धन सपकाळ

प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता अजित पवारांनी दमदाटी केली, ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सवेक आहात मालक नाहीत, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना समितीची आठवण आली नाही का? राज्याची आर्थिक परिस्थिती दिसली नाही का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सकारकडे निधी नाही तर अदानी अंबानीसाठी लाखो करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कोठून? शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भाजपा युती सरकार हे फक्त अदानी अंबानीसाठी पायघड्या घालते पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सुरजागडच्या खदानीमधून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तीपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरु आहे. सत्तेतून मलाई खाता आणि शेतकरी व भगिनींना देण्यासाठी पैसे कसे नाहीत..असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.

राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी शहांकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, तेवढी तरी हिम्मत दाखवा. समितीचा खेळ करू नका व तातडीने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या. शेतकरी, भगिनी व जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका ते महागात पडेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Scroll to Top