ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन

मुंबई (शांताराम गुडेकर) : आगासन गाव येथील शांत, सरळ व्यक्तिमत्व असणारे पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे बुधवारी ११ जून रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी सीताबाई पांडुरंग मुंडे,मुले चिंतामण,उदय, प्रदीप,बहिणी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.नेहमीच शांत स्वभाव असणारे , तसेच सर्वांशी आपुलकीने वागणारे पांडुरंग यांचे व्यक्तिमत्व होते.त्यांच्या जाण्याने मुंडे परिवार व आगासन ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.आगासन येथील समश्यानभूमीत बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठया प्रमाणात मुंडे कुटुंबीय, व नातेवाईक उपस्थित होते.त्यांचा दशक्रिया विधी दिनांक २० जून रोजी आगासन येथील गणेश घाट येथे होणार असून उत्तरकार्य तेरावा विधी दिनांक २३ जून रोजी मुक्काम आगासन पोस्ट दिवा ,तालुका जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Scroll to Top