ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

दामोदर हॉल अनेक्स’चे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे : पालकमंत्री ना. ॲड. आशिष शेलार

प्रतिनिधी : दि सोशल सर्व्हिस लीग’ या संस्थेची ११४ वर्षाची वाटचाल ही अभिमानास्पद असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील असंख्य विद्यार्थी हे विविध क्षेत्रात नाव कमावून आहेत. या संस्थेच्या
‘दामोदर हॉल अनेक्स’चे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे, असे उद्गार मुंबई उपनगरचे पालकमंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले. या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी मी कटीबद्ध राहीन असेही त्यांनी स्पष्ट केले. मा. मंत्री महोदयांनी आगमनानंतर संस्थेचे सं

स्थापक ना. म. जोशी यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली.
त्यांच्या हस्ते संस्थेच्या विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर हे होते. संस्थेचे विश्वस्त सिताराम गिरप यांनी लिहिलेले ‘स्वयं विकासाच्या वाटेवर’ हे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘दि सोशल सर्व्हिस लीग’ या संस्थेच्या विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर, उपाध्यक्ष विजय वर्टी,
खजिनदार मदन देसाई, सचिव प्रकाश कोंडुरकर दिसत आहेत.

Scroll to Top