Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रसत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश.... भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र...

सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश…. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले स्वागत

प्रतिनिधी : शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर तसेच खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आ. सत्यजित देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी कार्याध्यक्ष चव्हाण म्हणाले की 2019 आणि 2024 ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विधानसभा उमेदवार असलेल्या श्री. पाटणकर आणि श्री. पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. पाटणकर आणि श्री. पाटील यांनी भाजपाला साथ दिली आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित मान राखला जाईल अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सोबत हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार, आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पाटण तालुका दूधसंघ, अर्बन बँक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन तसेच सर्व संचालकांनी तसेच सर्व आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सर्व सदस्यांनी ही भाजपा मध्ये प्रवेश केला. पाटण नगर पंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments