ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

लोकमाता अहिल्यामाई होळकर सन्मान पुरस्काराने संजय मधुकर मुळे सन्मानित

प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संजय मधुकर मुळे यांचा नुकताच लोकमाता अहिल्यामाई होळकर सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला त्यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, आम्ही भारतीय महिला मंच, लोकमाता अहिल्यामाई विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.*लोकमाता अहिल्यामाई होळकर* यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना *लोकमाता अहिल्यामाई होळकर सन्मान पुरस्कार* देण्यात येतो. कार्यक्रमास डॉ. वर्षा चौरे, कोल्हापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे, लातूरचे ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. मंचकराव डोणे, आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल आदी मान्यवर उपस्थित होते

यापूर्वी संजय मुळे यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला असून यात द एक्सलंसी आयकॉनिक ॲवॉर्ड आणि फाव ॲण्ड फेअर्स यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ‘बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर’, महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराचा समावेश आहे. याशिवाय नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार, एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार अशा विविध पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Scroll to Top