ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

जिल्हाधिकारी सातारा यांची वेंगळे वरचीवाडी शाळेस भेट

तापोळा : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेंगळे वरची वाडी येथे भेट दिली, शालेय गुणवत्ता, भौतिक बाबी, सहशालेय उपक्रम आदी बाबींची तपासणी केली, शाळेची प्रगती तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथ श्रीमती मुजावर मॅडम, शिक्षणाधिकारी माध्य. श्री चोपडे साहेब, मुख्यालय विस्तार अधिकारी श्री आडे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री आनंदजी पळसे साहेब, विस्तार अधिकारी श्री भिलारे साहेब, केंद्रप्रमुख श्री संकपाळ साहेब, केंद्रप्रमुख श्री जंगम साहेब, ऑपरेटर श्री कोळी सर तसेच वेंगळे वरची वाडी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय संकपाळ सर तसेच उपशिक्षक श्री माधव शिंदे सर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक राज्यगीताचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली._

Scroll to Top