मुंबई (शांताराम गुडेकर) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई , विभागीय शाखा विरार,संलग्न कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ विरार यांच्या माध्यमातून विभागीय शाखा विरार चे खजिनदार शैलेश बामणे, शाखेचे सहसचिव सिताराम नवाले तसेच पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था, भारतचे अध्यक्ष विजय चोघळा यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय शाखा विरारचे अध्यक्ष किशोर भेरे आणि कुणबी रणरागिणी मा.नगरसेविका तथा कुणबी महिला मंडळ विरारच्या अध्यक्षा सौ. संगीताताई भेरे, कुणबी युवा अध्यक्ष अविनाशजी पाचकले यांच्या मार्गदर्शनाने बोरिवली ब्लड बँक,दहिसर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर रविवारी ( १ जून) ज्युपिटर स्कूल,मनवेल पाडा येथे पार पडले.
या कार्यक्रमाला विभागातील रक्तदात्यांनी सकाळपासूनच उत्फुर्त प्रतिसाद दिला.रक्तदात्याच्या प्रतिसादाने दिवसभरात १५० पेक्षा जास्त रक्त दात्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १०१ रक्त दात्यांनी यशस्वी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.या कार्यक्रमाला नालासोपारा विधानसभेचे मा.आमदार क्षितिज ठाकूर यांची खास उपस्थिती लाभली.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस कृष्णा वणे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस संतोष कांबळे,समाजसेवक कुळये गुरुजी,कुणबी बँकेचे संचालक पी.डी.ठोंबरे, ज्ञानदीप क्लास विरारचे संचालक दीपक भरणकर,माणगावचे कुणबी समाज सेवक प्रकाश दसाळे,समाजसेविका सौ.पालांडे ताई,कुणबी उद्योजक अनंत फिलसे, सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक कुणबी व्यावसायिक मस्कर,कुणबी युवा मुबंईचे शिलेदार मोरे उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून रक्तदानाला उपस्थिती वि.आ.मा.युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर, संघटक अजीवजी पाटील,स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, नगरसेविका सौ.चिरायूताई चौधरी,मीनलताई पाटील,रिटाताई सावरिया,पत्रकार दिपक मांडवकर,विरारचे प्रभोधनयोद्धा आयु.विजय कदम, रिअल इस्टेटचे सल्लागार कुणबी समाज सेवक सावंत, कुणबी युवा मुंबईचे माजी अध्यक्ष अनंत साळवी,मनवेलपाडा सामाजिक संस्थाचे पदाधिकारी गणेश गावडे, परशुराम नाईक, विक्रम चाळके,कोकण नगर चे विनायक शिगवण, कार्यक्रमासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून देणाऱ्या सौ. सामंत मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय शाखा विरारचे सर्व पदाधिकारी,सदस्य, कुणबी युवा विरारचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते सदस्य त्याच बरोबर कुणबी महिला मंडळ विरार च्या पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य याचे मोलाचे योगदान लाभले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव एकनाथ डिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व रक्तदाते,मान्यवर, समाज सेवक,कार्यकर्ते,महिला मंडळ यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विरार येथे कुणबी समाजाचा भव्य रक्तदान शिबिर मोठया उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES