ताज्या बातम्या
परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणारचिराग नगर रस्ता कामातील निकृष्ट वॉटर टेबल हटवले; सोशल मीडियावरील आवाजानंतर पालिकेची दखल

आता रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभे राहून तिकीट काढता येणार

प्रतिनिधी : तिकिटासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची आता गरज नाहीय. रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. रेल्वेने युटीएस अॅपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता प्रवाशांना रांगेत उभं न राहताही प्लॅटफॉर्मवरच लोकलचे तिकिट काढता येणार आहे. रेल्वेने केलेल्या या बदलामुळं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रेल्वेने हा बदल केला आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्य शहरांतील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. रेल्वेने युटीएस अॅपवर तिकिट काढण्यासाठी संपूर्ण देशातील रेल्वे रूळांसाठी जिओ फेसिंग केली आहे. कारण लोक ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीला बघून तिकिट काढू शकतात. त्यामुळं रेल्वे रूळांपासून 20 किमी अंतरावर असताना अॅपमधून तिकिट काढण्याची मर्यादा होती. मात्र आता त्यात बदल करुन ही मर्यादा शून्य केली आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्म उभं राहूनही तुम्ही तिकिट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला स्थानकाच्या बाहेर जावं लागणार नाही. अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटिएस अॅपमधून तिकिट काढण्यासाठी तुम्हाला युटीएस अॅप डाउनलोड करावं लागेल. हे अॅप अँड्रोइड आणि IOS प्लॅटफॉर्मवरून डाइनलोड करु शकतात. जर तुमच्याकडे अँड्रोइड फोन आहे तर प्ले स्टोअर मधून हे अॅप डाउनलोड करु शकता. युटीएस अॅपमधून तिकिट काढताना दोन पर्याय आहेत. पहिला पेपरलेस म्हणजेच अॅपमधूनच तुम्ही टीटीला तिकिट दाखवू शकता. तर, दुसरा पर्याय प्रिंटेड तिकिट त्यासाठी तुम्हाला अॅपमधून रेल्वे स्थानकात लावलेल्या ऑटोमॅटिक वेंडिग तिकिटमधून पेपर तिकिट प्रिंट करु शकतात.

Scroll to Top