Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकांदिवली आणि बोरिवली २ मे रोजी परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार

कांदिवली आणि बोरिवली २ मे रोजी परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार

प्रतिनिधी : मुंबईत सध्या काही ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्याने पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून ते ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे बुधवारीच जास्तीचा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

प्रतिनिधी : मालाडमधील मीठ चौकी जंक्शन ते कांदिवली येथील महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करून त्या २४ तासांत जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. गांधी नगर, संजय नगर, लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव, बंदर पखाडी, भाबरेकर नगर या परिसरात ३ मे रोजी पाणी येणार नाही.
जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत या परिसरात देखील ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील. चारकोप म्हाडा सेक्टर ०१ ते ०९ मध्ये ३ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णता बंद असेल. आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम), महावीर नगर, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, म्हाडा एकता नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण येथे २ मे रात्री १० ते ३ मे रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments