ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

१००% निकाल! एस.व्ही.एन. इंग्लिश हायस्कूलचा निकालात ‘परफेक्ट स्कोअर’

प्रतिनिधी : कोपरखैरणे, सेक्टर 2/A : श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस.व्ही.एन. इंग्लिश हायस्कूलने यंदाही आपली यशाची परंपरा कायम ठेवत १००% निकालाची घौडदौड कायम राखली आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वीरीत्या परीक्षेत बाजी मारत शाळेचे नाव उज्वल केलं आहे!

ही कामगिरी म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांची वचनबद्ध साथ, आणि शाळेने तयार केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणाचे फळ म्हणावी लागेल. दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी ही शाळा आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राम पाटील सर, मुख्याध्यापिका, सुपरवायझर, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

“ही फक्त सुरुवात आहे, आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आमची गुणवत्ता यशाचे शिखर गाठणारच!” – असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top