बामणोली(अजित जगताप) : जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील सह्याद्री वाघ्र प्रकल्पाने विस्थापित झालेल्या भूमिपुत्रांचे आदिवासी भागात पुनर्वसन झाले त्या ठिकाणी हाल झाले. त्यांनी आता प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन झालेल्या गावाला अखेरचा दंडवत केला आहे. महाबळेश्वर जवळ जावळी तालुक्यातील जंगलातच ठाण मांडून भूमिपुत्रांनी संसार जंगलातच जंगली प्राण्यांची भीती न बाळगता थाटला आहे. त्यामुळे पुनर्वसन विभागाच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी,वासोटा येथील प्रकल्पग्रस्त मूळ गावी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. जंगलातील कोअर झोनचा त्यांनी आश्रय घेतला आहे.
भिवंडी तालुक्यातील एकसळ, सागाव येथे झालेले पुनर्वसन विस्थापितांना मान्य नाही . जावळी महाबळेश्वर याच मतदारसंघातील पुनर्वसन व मदत कार्यमंत्री मकरंद पाटील हे राज्यात नेतृत्व करतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावच्या नजीकच भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे
सह्याद्री .व्याघ्र प्रकल्पाच्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव ता. भिवंडी जि. ठाणे या ठिकाणी २०१५ साली पुर्नवसन करण्यात आले. एकूण १२० प्रकल्पग्रस्त खातेदारांकरीता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून २४२ हेक्टर जागा दिली होती. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण ७० कुटुंबांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. त्यापैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले. मात्र गावातील काही प्रस्थापित आदिवासी लोकांचा त्रास, मारहाण या लोकांना गेल्या दहा वर्षापासून होत आहे. हिंदू बांधवांवर अन्याय होऊन सुद्धा हिंदू संघटना मूग गिळून गप्प आहेत. त्या त्रासाला कंटाळून तसेच पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, वीज यासह अन्य सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी जावळी व महाबळेश्वर तालुक्यात परतण्याचे निश्चित केले.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एकसळ सागाव जि. ठाणे येथून सुमारे २२ प्रकल्पग्रस्त मिनी ट्रॅव्हल्सने आपल्या जन्मभूमीत आले. तेथून कुरोशी पुलावरून वाघावळे, उचाट, आकल्पे येथे पोहोचले. त्यानंतर आकल्पे तून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास आडोशी हे मूळ गाव त्यांनी गाठले. तेथील पडक्या, उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारती समोर संसार मांडून तेथे ठाण मांडले आहे.
यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वनपरिक क्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे मीठा पोलिस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांची ठाम राहिले आहेत.
[ पायी मार्गाने चालत मुळ गाव गाठलेच
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या जंगलातील मूळ गावी येऊ नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली होती. तरीही जीव वाचवण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त आडोशी येथील त्यांच्या मूळ गावातील शाळेसमोर आले . मात्र ,या शाळेतील खोलीमध्ये मेलेल्या म्हशीचे सांगाडे आढळून आले. दुर्गंधीही पसरली होती. या म्हशी प्रकल्पग्रस्तांच्या असल्याचे बोलले जात होते तर मेलेल्या म्हशीचे सांगाडे दिसले. तर ज्या ठिकाणी पुनर्वसन केले आहे त्या ठिकाणी कोणतेही सुविधा नाही. काही प्रस्थापित आदिवासींच्या आरेरावी पणाला कंटाळून गेले आहेत. ज्या ठिकाणी जागा वाटप केली त्यातील बहुतांश जागेवर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले आहे. पुनर्वसनाने अच्छे दिन येतील असं वाटणाऱ्या भूमिपुत्रांना आता काँग्रेस राजवटीतील बुरे दिन जगण्याचं बळ देत असल्याची टीका होऊ लागलेली आहे.
____________________________
फोटो — आदिवासी भागातील पुनर्वसनाचे हाल अनुभवून मूळ भूमिपुत्र परतले जावळी महाबळेश्वरला (छाया– अजित जगताप बामणोली)