प्रतिनिधी : आज रविवार, दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता, श्री बाळसिद्ध मंदिर, घोगाव येथे सावली सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्याचा शुभारंभ श्री बाळसिद्ध चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.
या वेळी अनेक ग्रामस्थ, मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.सावली संस्थेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याची (लाकूड, कापड व इतर साहित्य) विनामूल्य व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली आहे.
ही सुविधा घोगाव गावातील सर्व वाड्यांसाठी (शेवाळवाडी, संभाजीनगर, शिवाजीनगर, साईनगर इत्यादी) उपलब्ध आहे.आपण सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि गरजूंना वेळेवर मदत मिळवून द्यावी, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे.
या सेवाभावी कार्यात आपणही सहभागी व्हा!
आपले मनःपूर्वक सहकार्य खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून करता येईल:शामराव नागरिक सहकारी पतसंस्था, घोगाव शाखेच्या QR कोडवर ऑनलाइन पेमेंट पाठवावे.
श्री रमेश शेवाळे किंवा श्री नेताजी पाटील यांच्याशी संपर्क साधून पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवणेआपल्या देणगीची अधिकृत नोंद घेण्यात येईल व त्याची पावती दिली जाईल.सामाजिक कार्य हीच खरी सेवा!आपणही यामध्ये आपले योगदान नक्की द्या.संपर्क:
श्री रमेश शेवाळे – [मो. नं.] 9881812898
श्री नेताजी पाटील – [मो. नं.] 8600456362
सावली सामाजिक सेवाभावी संस्था, घोगाव “सेवेतून समाजोन्नती” चा शुभारंभ
RELATED ARTICLES