Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्र"घावरी गावात 'शोध पाण्याचा, संकल्प शेतीचा' उपक्रमाची सुरुवात"

“घावरी गावात ‘शोध पाण्याचा, संकल्प शेतीचा’ उपक्रमाची सुरुवात”

घावरी,महाबळेश्वर : गेली दोन महिने घावरी ग्राम सेवा संघ, मुंबई यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘शोध पाण्याचा, संकल्प शेतीचा’ या उपक्रमाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली. या उपक्रमाचा उद्देश पाणी व्यवस्थापन, शेतीतील सुधारणा आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आहे.

कार्यक्रमात गावचे सरपंच मा. अकबरभाई शरवान, उपसरपंच मा. श्री विजय सकपाळ, मुंबई मंडळ अध्यक्ष श्री प्रकाश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच प्रमुख मार्गदर्शक श्री रमेश सकपाळ, श्री तानाजी सकपाळ, श्री बाळकृष्ण सकपाळ, श्री किसन जाधव, ज्येष्ठ नागरिक श्री बापू दादा सकपाळ, श्री राजाराम सकपाळ आणि श्री महादेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी मिळून या उपक्रमाच्या माध्यमातून गावच्या शेती विकासासाठी आणि पाण्याच्या शाश्वत उपयोगासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, पुढील टप्प्यांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments