ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

मुंबईत ठाकरे गटाला अजून एक धक्का,एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कारकर दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई :

मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत उबाठा गटाचे नगरसेवक राहिलेले हर्षद प्रकाश कारकर यांनी पत्नी सौ. दिक्षा हर्षद कारकर यांच्यासह आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील टेंम्बवलकर, शिवसेना महिली आघाडीच्या विभागप्रमुख मीना पानमंद हेदेखील उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत शिवसेना आणखी भक्कम झाली आहे.

आज पक्ष प्रवेश केलेल्या दिक्षा कारकर या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, तसेच आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी पक्षप्रवेश केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्ते, वाहतूक, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्यात नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कामामुळे लोकांचा शिवसेनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील शिवसेना संघटनात्मक पातळीवर अधिक बळकट होईल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Scroll to Top