Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रकाटवलीच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ; आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन...

काटवलीच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ; आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन तर ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन

भोसे : काटवली ग्रामस्थानी झाल्या चुका सुधारल्या आहेत याच समाधान आहे पण यापुढे सर्वांनीच विकासाच्या मागे कायम राहण्याचा प्रमाणिक प्रयत्न करावा. आपण मंत्री झालो असलो तरी तो तुमच्यामुळे झालो आहे याची जाण असल्यानेच जावळीच्या दऱ्या खोऱ्यात गावोगावी विकासाची गंगा पोहोचवण्यात यशस्वी झालो आहे. काटवली गावच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

काटवली (ता. जावळी ) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे इमारतीचा उद्घाटन आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे , जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे, भाजपचे जावळी तालुका अध्यक्ष संदीप परामने, नियोजन कमिटीचे सदस्य प्रवीणशेठ भिलारे, , जावळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, गटविकास अधिकारी निलेश पाटील ,डॉ विनोद गडदे , मच्छिंद्र मुळीक, विनोद कळंबे, जगन्नाथ शिंदे, नितीन गावडे, वहागावच्या सरपंच संगीता शिराळे, काटवली सरपंच मीनाक्षी बेलोशे, विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे इमारतीचे उद्घाटन नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते फित कापून तसेच राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर सरपंच सौ मीनाक्षी बेलोशे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

यापुढे महू धरण परिसरातील दापवडी, रांजणी, वहागाव, बेलोशी, काटवली शिंदेवाडी व रुईघर गावांच्या विकासाला गती देण्याचा माझा प्रयत्न असून या परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध संकल्पना राबवण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही याची मी काळजी घेत आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका ह्या भाजपच्या माध्यमातून लढण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा. असेही ना. भोसले यांनी सांगितले.
काटवली गावच्या महिला बचत गट भवनासाठी जागा उपलब्ध करून द्या आपण त्यासाठी जास्तीत जास्त निधी देऊ असे सांगून ते पुढे म्हणाले मी मंत्री झालो तरी कधीही सायरन वाजवत नाही, लाल दिवा वापरत नाही. मी कधीच मंत्रिपदाचा आविर्भाव सांगत नाही पण मंत्रिपदाने मला महाराष्ट्रभर फिरावं लागत आहे. त्यामुळे वेळेअभावी कुणाही नाराज न होता विकासाच्या मागे कायम राहा असेही शेवटी त्यांनी सांगितले.

काटवलीत बाबांच्या माध्यमातून रस्ता डांबरीकरण, ग्रामपंचायत इमारत, सभामंडप, स्मशानभूमी रस्ता अशी अनेक कामे झाली आहेत. पुढे स्मशानभूमी रस्ता, सुशोभीकरण , पाण्याची योजना, दवाखान्यासाठी आरोग्य अधिकारी व इतर सर्व कामे लवकरच मार्गी लागतील यात शंका नाही. आपण सर्वजण कायम विकासाच्या पाठीशी म्हणजेच बाबांच्या पाठीशी राहु असे वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे प्रदीप बेलोशे, माजी सरपंच हणमंत बेलोशे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, राम बुवा रांजणे, ॲड. तुकाराम बेलोशे, शिंदेवाडी सरपंच धनंजय शिंदे , रुईघर सरपंच अंकुश बेलोशे , तुकाराम बेलोशे, युवा नेते सुयोग बेलोशे , श्री. देशमुख सर, गणेश जंगम, संतोष बेलोशे, वसंतराव बेलोशे, विक्रम पोरे, बबनराव शिंदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य केंद्राचे कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा व परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
संतोष बेलोशे यांनी प्रास्ताविकात गावच्या विकास कामाचा आढावा घेत समस्यांचाही वेध घेतला. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन गावडे यांनी आभार मानले.
चौकट : मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गावात आले त्याबद्दल आणि भाजपचे जावळी तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या संदीप परामणे यांचा ग्रामस्थांचे वतीने भव्य असा सत्कार यावेळी करण्यात आला.

सोबत फोटो आहे.
काटवली : आरोग्य उपकेंद्राचे फित कापून उद्घाटन करताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शेजारी वसंतराव मानकुमरे ,राजेंद्रशेठ राजपुरे, मीनाक्षी बेलोशे व इतर दुसऱ्या छायाचित्रात ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन करता मीनाक्षी बेलोशे शेजारी शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे ,सौरभबाबा शिंदे व इतर ( रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्रसेवा )

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments