Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रकराडमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा सभा संपन्न; आमदारांच्या उपस्थितीत कृषी योजनांचे अनावरण

कराडमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा सभा संपन्न; आमदारांच्या उपस्थितीत कृषी योजनांचे अनावरण

कराड (विजया माने) : दिनांक 6 मे 2025 रोजी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार कराड तालुका स्तरावर खरीप हंगामपूर्व आढावा सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे प्रमुख उपस्थित होते.

सभेपूर्वी आमदार डॉ. भोसले यांनी ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्राप्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कराड याची पाहणी करून कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात माती, पाणी व बियाण्यांच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर आमदारांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या QR कोड फ्लेक्स बॅनरचे अनावरण करण्यात आले.

तसेच, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना मंजुरी पत्रांचे वाटपही करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणपत्राचे सन्मानपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आमदारांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री. दत्तात्रय खरात यांनी 2025-26 खरीप हंगामासाठी तयार करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. आमदारांनी आपल्या मनोगतातून कृषी विभागाच्या कार्याचे कौतुक करताना, “तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवण्याचे मोलाचे कार्य हे अधिकारी व कर्मचारी करत आहेत,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ह्युमन नियंत्रण, बीज प्रक्रिया, व बियाण्यांची उगम क्षमतेची चाचणी यासारख्या प्रत्यक्षिकांचे सादरीकरणही करण्यात आले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments