कराड(प्रताप भणगे) : कराड तालुका वकील संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. दीपक थोरात (ओंड) व उपाध्यक्षपदी ॲड. विशाल माने (तुळसण) यांची निवड झाली. या यशस्वी निवडीबद्दल त्यांचा रयत संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर), कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, माजी चेअरमन हनुमंतराव चव्हाण, रयत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. धनाजी काटकर (सर), ॲड. प्रवीण केंजळे, ॲड. शशिकांत मोहिते, ॲड. अनिल माळी, ॲड. आबासाहेब जगताप, ॲड. विशाल शेजवळ, ॲड. शंकरराव लोकरे (संचालक, रयत सहकारी साखर कारखाना) व सचिन पाटील (संचालक, यशवंत सहकारी बँक, फलटण) आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी निवड झालेल्या वकिलांचे अभिनंदन करताना त्यांच्याकडून संघटनेच्या उत्कर्षासाठी कार्य होईल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.