Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्र2 जून रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

2 जून रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे मे महिन्याच्या लोकशाही दिनामध्ये प्राप्त 2 अर्जांपैकी आरोग्य विभागाशी निगडीत 1 अर्जदाराच्या निवेदनावर आधीच कार्यवाही झाल्याने त्यांच्यामार्फत अर्ज मागे घेण्यात आला. तसेच मालमत्ताकर विभागाशी संबंधित 1 अर्जाची सुनावणी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतली.

माहे जून महिन्याचा लोकशाही दिन दि. 2 जून 2025 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 19 मे 2025 पर्यंत मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे लोकशाही दिनाकरीता अर्ज असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाच्या (Website) मुख्यपृष्ठावर जलद दुवे (Quick Links) आयकॉनवर उपलब्ध असून ती अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 , किल्ले गांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथेही प्रत नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

अर्ज करताना नागरिकांनी शासन निर्णयानुसार अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे याची दखल घ्यावयाची आहे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक आस्थापना विषयकबाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावयाची आहे.

विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments