अंतवडी,कराड (प्रताप भणगे) : आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन, भारताचे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांना १२ तासांच्या कामाच्या बदल्यात ८ तासांचा कामाचा अधिकार मिळवून दिला. या ऐतिहासिक योगदानाच्या स्मरणार्थ ‘एक मे’ हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्त आज अंतवडी,कराड ग्रामपंचायतीत कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. उज्ज्वला साळुंखे होत्या. ध्वजारोहण ग्राम रोजगार सहाय्यक जयवंत माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य मनोज माने (फौजी), मनीषा संभाजी शिंदे, सीमा चव्हाण, हनुमंत शिंदे, आबा आनंदा शिंदे, माजी उपसरपंच सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, बापूराव सर, युवराज शिंदे, आनंद माने, सचिन शिंदे, बाळू शिंदे तसेच रिसवड अंतवडी विकास सेवा सोसायटीचे संचालक भागवत माने आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन ग्रामपंचायत अंतवडी यांच्या वतीने करण्यात आले.