ताज्या बातम्या

स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनी जान्हवी शिंदेचा उज्वल यशोमार्ग!

कराड(प्रताप भणगे) : आपल्या गावची विद्यार्थिनी जान्हवी राजेंद्र शिंदे हिने नवोदय व स्कॉलरशिप स्पर्धेत 95% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जान्हवीने अतिशय मेहनतीने व चिकाटीने अभ्यास करत हे यश मिळवले. फक्त 1% गुण कमी पडल्यामुळे नवोदय विद्यालयाकडून संपूर्ण शिक्षणाचा खर्च मिळण्याची संधी हुकली असली, तरी तिचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. तिच्या या यशाने संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.

या उपक्रमामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ‘सायकल बक्षीस’ योजना राबवण्यात आली. या उपक्रमात विक्रम जगदाळे, अल्ताफ भालदार, प्रकाश चव्हाण दादा, विकास भाऊ सावंत आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी स्वतःच्या खर्चातून सायकलचे बक्षीस दिले. हे बक्षीस शाळेत अगोदरच आणून ठेवले गेले होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते पाहून प्रोत्साहन मिळेल आणि स्पर्धेसाठी अधिक मेहनत घेतील. त्यांच्या या नियोजनाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

खरेतर, एका विद्यार्थ्याचा पाया घडवण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची असते. आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक हे अतिशय समर्पितपणे शिक्षण देत असून, यापुढेही तेच समर्पण टिकवून ठेवतील, याबाबत खात्री व्यक्त करण्यात आली आहे. या यशामागे शाळेच्या शिक्षकांचेही मोठे योगदान असून, त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top