Sunday, June 22, 2025
घरमहाराष्ट्रजुळेवाडी येथे "कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू" अभियानाचा भव्य शुभारंभ

जुळेवाडी येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू” अभियानाचा भव्य शुभारंभ

कराड(प्रताप भणगे) : जुळेवाडी,कराड येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू” या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सरपंच नितीन बाकले, गट समन्वयक सौ. पूनम पाटील, ज्योती अंबवडे, उमेदचे सुशांत सर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र जाधव, सदस्य, ग्रामरोजगार सहाय्यक गणेश बाकले, CRP, बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव तसेच महिला मंडळ उपस्थित होते.

कार्यक्रमात ग्रामपंचायत जुळेवाडी यांच्यावतीने गावात डस्टबिनचे वाटप करण्यात आले. सौ. पूनम पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थितांना घनकचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा वर्गीकरण तसेच जलतारा, वैयक्तिक शोषखड्डे, परसबाग सांडपाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

सुशांत सर यांनी ‘उमेद’ अंतर्गत गावात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी गावातील नागरिकांनी जलतारा व वैयक्तिक शोषखड्डे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले व घनकचरा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात घरकुल योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच नितीन बाकले यांनी सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानत कार्यक्रमाला रंगत आणली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments