ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

कट्टर शिवसैनिक किशोर कदम यांचे अपघाती निधन

प्रतिनिधी : धारावीतील शास्त्रीनगर परिसरात राहणारे, शिवसेनेचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते किशोर कदम यांचे अपघाती निधन झाले आहे. मंगळवार रात्री काही कामानिमित्त आपल्या गावी निघाल्यानंतर बुधवारी पहाटे फलटण (जि. सातारा) येथे त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांचे पार्थिव धारावी येथे आणले जाणार असून, आज रात्री ८ वाजता धारावी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसेना व धारावी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे. कट्टर शिवसैनिकाचा असा अचानक जाणं, हा शिवसेनेसाठी आणि परिसरासाठी मोठा धक्का आहे.

Scroll to Top