ऑटोइम्यून रोगावर सेल बेस थेरपीचा विजय!
१५ वर्षीय केनियन रुग्णावर स्टेमआरएक्समध्ये यशस्वी उपचार
नवी मुंबई – एकेकाळी आनंदाने शाळा आणि दिनक्रमाचा अनुभव घेणाऱ्या केनियातील १५ वर्षीय शॅनन रॉननला अचानक गंभीर आजाराने गाठले. सुरूवातीला सर्दीसारख्या लक्षणांनी सुरू झालेल्या त्रासाने तिला अंथरुणाला खिळवले. डॉक्टरांकडून विविध चाचण्या होऊनही निदान होईना. अखेर भारतात, स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. प्रदीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्टेम सेल थेरपीद्वारे तिला नवजीवन मिळाले.
शॅननला पॉलीमायोसिटिस हा दुर्मिळ ऑटोइम्यून रोग झाल्याचे निदान झाले – एक असा आजार ज्यामध्ये स्नायूंमध्ये सूज येऊन हालचाल अशक्य होते. चालणे, बोलणे, खाणे-पिणेही अशक्य झाले होते. मात्र, स्टेम सेल थेरपी, टार्गेटेड फिजिओथेरपी आणि न्यूरो-रिहॅबिलिटेशनच्या संयोजनाने शॅननच्या शरीराला नवसंजीवनी मिळाली.
डॉ. महाजन सांगतात, “उपचारांमध्ये लक्षणांवर फक्त इलाज न करता, मूळ कारण शोधून त्यावर उपाय करण्यात आला. स्टेम सेल थेरपीने तिच्या स्नायूंची पुनर्निर्मिती होऊन शारीरिक व भावनिक उर्जाही परत मिळाली.”
शॅननने भावना व्यक्त करताना सांगितले, “मी पुन्हा चालू शकेन याची कधी कल्पनाही केली नव्हती. पण इथे मला वेदनामुक्त जीवन आणि आत्मविश्वास परत मिळाला.”
शॅननच्या आईने नम्रतेने कबूल केले की, “मुंबईतील या उपचारांनी आमचं आयुष्यच बदलून टाकलं. स्टेमआरएक्स हे आमच्यासाठी देवदूत ठरले.