प्रतिनिधी(प्रताप भणगे) : पंचायत समिती कराड येथे पी एम जनमान मधील लाभार्थी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये korti येथील १९ लाभार्थींना घरकुल मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. व घरकुल बांधकाम संबंधी RHE यांनी मार्गदर्शन केले. तसेच आधार कार्ड , आयुष्यमान भारत कार्ड ,रेशन कार्ड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व आयुष्मान भारत कार्ड सात लाभार्थी चे काढून देण्यात आले. सदर कॅम्पला मा गटविकास अधिकारी पाटील साहेब तसेच विस्तार अधिकारी सांख्यिकी बोलके साहेब यांनी मार्गदर्शन केले .सदर कॅम्प ला नायब तहसीलदार बाजीराव पाटील साहेब , पुरवठा अधिकारी सुरवसे मॅडम,क्लार्क , ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, लाभार्थी , ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.




