मुंबई प्रतिनिधी : मुलुंड पोलिस ठाणे ,ते भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पोलिस डिसीपी झोन व सर्व शाळा यांच्या अनुषंगाने व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविण्यात आला होता! तंबाखूजन्य शालेय परिसरात परिमंडळ-7,मुंबई मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली कारवाई एकूण:635 कोटपा अधिक.6 (ब) अन्वये ,
मा.अप्पर पोलीस आयुक्त डॉ. श्री.महेश पाटील, पोलीस उपायुक्त:श्री.विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त:संदीप मोरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलुंड:श्री.अजय जोशी ,
निर्भया अधिकारी :कु.पुजा बाबासाहेब धाकतोडे,पोलीस उपनिरीक्षक मुलुंड पोलिस ठाणे,परिमंडळ 7 मधील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व निर्भया अधिकारी,मुंबई पत्रकार: श्री.सतिश वि.पाटील ,
सर्व स्थरांतून अनेक मान्यवर तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते व्यसनमुक्ती वर अनेक भाषण देवून जनहितार्थ जागरूकता व दक्ष नागरिक म्हणून आपलेही कर्तव्य आहे आपल्या आसपास जर काही मादक पदार्थ विक्री ,गैरव्यवहार व घटना घडत असतील तर पोलिसात कळवून वेळीच आळा घालण्यात मदत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे ! लहानमुलांना टपरी वा दुकानात तंबाखूजन्य, मादक द्रव्य आणण्यास पाठवू नये याची काळजी घेण्यात यावी नंतर हीच मुले व्यसनाकडे वळतात, डिसीपी तसेच अन्य पोलिस अधिकारी यांनी व्यसनमुक्तपर मार्गदर्शन केले .तसेच शाळेतील काही शिक्षकांनीही मार्गदर्शन करून व्यसनमुक्त कसे राहायचे व आपल्या मुलांना व समाजात वाढत असलेले व्यसन बंद करण्यासाठी काय काय उपाययोजना राबविण्यात येतात यांच्यावर सल्ला देण्यात आला ! या कार्यक्रमात कालिदास नाट्यगृह खचाखच भरले होते शेवटी अधिक खुर्च्यां लावण्यात आल्या ! हास्य कलाकार गौरव मोरे व पुष्कर क्षेत्री यांनी उपस्थित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले !
परिमंडळ ७ च्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न
RELATED ARTICLES