प्रतिनिधी (प्रताप भणगे) : कराड शहरातील
दत्त चौक येथील सूर्या कॉम्प्लेक्स मध्ये टेरेसवर असणाऱ्या अनधिकृत मोठ्या फ्लेक्स बॅनरचा काही भाग खाली पडला. मोठी दुर्घटना होता होता वाचली. येथे
एखादा जीव जाऊ शकतो अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. याअगोदर मुंबई पुणे सारखी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन बघत आहे का ? असा संतप्त सवाल कराड तालुक्यातील दक्ष नागरिक विचारत आहेत. मागील वर्षी पुणे मुंबई या ठिकाणी अनेक ठिकाणी असे बोर्ड पडून अनेक दुर्घटना झाल्या असून अनेकांचे प्राण यात गेलेले दिसून आले आहे जीवित हानी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होत असून कराड शहर तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या बाजूने तसेच घरावर असणारे अनधिकृत बोर्ड हटणार का हा मोठा प्रश्न आहे याबाबत संबंधित प्रशासन जबाबदार अधिकारी वर्गाने वेळेत पाऊल उचलावी अशी मागणी सर्वसामान्य जनमानसातून होत आहे.




