ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांच्या शिलेदारांना झटका

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप मुख्य असलेल्या महायुती आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे चतुराई यामुळे मतांची विभागणी टळली. त्याचा फटका राज्यात काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या चार मंत्र्यांना बसला आहे. त्यांच्या शिलेदारांच्या पराभवामुळे मतदारांचा खरा कौल आता उघड झाला आहे.
सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समितीमध्ये अटीतटीची निवडणूक न होता सबकुछ भाजप असे काही प्रसारमाध्यमांनी चित्र रंगवले होते. परंतु ,मतदारांनी आता भाजप एकाधिकारी शाहीला लोकशाहीची शाई लावून खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवले आहे. या परिवर्तनाच्या लढाईमध्ये इतर पक्ष सहभागी झाले होते. त्यांचेही योगदान खूप मोठे आहे.
सातारा जिल्ह्यातील भाजप नेते व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांची भावजय सौ भारती अंकुश गोरे यांचा औंध गटात तर त्यांचे चुलत बंधू अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटात पराभव झाला असला तरी आंधळी गटांमध्ये सोनल शेखर गोरे विक्रमी मताने निवडून आलेले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वरणे गटात भाजपचे वैभव चव्हाण आणि जावळीतील कुसुंबी गटातील अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे. हा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागलेला आहे. सातारा तालुक्यातील कारी गटात भाजपचे राजू भोसले विक्रमी मताने निवडून आले आहेत. त्याची नोंद घ्यावी लागत आहे.
राज्याचे वजनदार मंत्री असा ज्यांचा उल्लेख केला जातो. ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्ये मावशी गटातून शिवसेनेचे भरत साळुंखे व गोकुळ तर्फ हेळवाक गटातील दत्तात्रय कदम यांना पराभवाची सामना करावा लागले आहे.
राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील नेते व मंत्री मकरंद आबा पाटील यांचे कट्टर समर्थक खेड बुद्रुक गटातील गणेश धायगुडे, भुईंज गटातील प्रमोद शिंदे यांचा पराभव झालेला आहे. चार मंत्र्यांच्या शिलेदारांना पराभवाशी सामना करावा लागला. विशेष बाब म्हणजे या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची पत्नी खटाव गटातील डॉक्टर प्रिया शिंदे या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. तर आमदार महेश शिंदे यांच्या खेड गटात भाजप उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रवादीचे कामे विक्रमी मताने निवडून आले आहेत. आमदार शिंदे यांचे नातेवाईक शिल्पा मिलिंद शिंदे यांचा विजय झालेला आहे. त्याचबरोबर माजी आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम शिवसेनेच्या चिन्हावर कोळकी गटातून निवडून आलेले आहेत. पाटण तालुक्यातील माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांचाही पराभव झालेला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात माळी धनगर व कुणबी मराठा दाखला असलेल्या महिला विशेषता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या निवडून आलेल्या महिला सदस्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीचे पारडे जड असून राष्ट्रवादी पक्षाकडून चार महिलांची नावे निश्चित मानण्यात येत आहे. याला सर्वांना मोठे दुजोरा मिळाल्यास भाजप विरोधी पक्ष म्हणून सातारा जिल्हा परिषद सभागृहात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top